महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० याचा फेर आढावा घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार सांस्कृतिक धोरण सुसंगत करणे, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांकडून आणि सर्वसामान्यांना नागरिकांकडून धोरणाच्या संदर्भात प्राप्त सूचनांनुसार विचारमंथन करून धोरण मसुदा शासनास सादर करणे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading