ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर मांडल्या समस्या

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर विस्थापन या विषयावर करत सर्व विस्थापित, भूमिपुत्र, आदिवासी, कोस्टल कम्युनिटी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. आदिवासी पाडे, माळघाट, कोकणात येऊ घातलेली रिफायनरी, वाढवण बंदर, जंगले कोळीवाडे, गावठाणे येथील विकासाच्या नावाखाली नाश होणाऱ्या पर्यावरणाच्या आणि विस्थापित होणाऱ्या सर्व समाजाच्या वतीने पदयात्रेत विस्तृत चर्चा केली. प्रत्येक गावाची मुठभर माती एका मडक्यात भरून ते एका आदिवासी पाड्यातील मुलीने स्वतः च्या हातानी चित्र काढून रंगविलेले मडके राहुल गांधी यांना हे मडके दिले की ही जमीन आमच्यासाठी खरेदी विक्री करण्याची, व्यवहार करण्याची वस्तू नाही हिचे आमच्या अस्तित्वासाठी संरक्षण करा. तसेच एका काचेच्या बाऊल मध्ये समुद्राचे, खाडी चे पाणी भरलेला बाऊल राहुल गांधी यांना भेट म्हणून दिली. मुंबईचा आद्य मुळ रहीवाशी असलेल्या कोळी समाजाचे मानबिंदू असलेली कोळी टोपी घालून कोळी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या समुद्रात, खाडीत होणाऱ्या पारंपारिक व्यवसाय असलेल्या मासेमारी वर आणि समुद्र, खाडी किनाऱ्यावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना देशाला स्वातंत्र्य भेटून ७५ वर्षे झाली तरी त्याच्या शाश्वत विकासासाठी आज पर्यंत कोणतेही नियोजन करण्यात आले नाहीत. जमीन हक्का पासून ते आजही वंचित आहेत ही देशासाठी किती खेदजनक घटना आहे. या गोष्टीत जातीने लक्ष घालावे म्हणून त्याचे प्रतिक म्हणून समुद्र आणि खाडीचे पाणी एका काचेच्या बाऊल मध्ये भरून तो बाऊल भेट म्हणून राहुल गांधी यांना देण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading