ठाण्यातील ३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

ठाण्यातील ३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करणा-या पोलीस उपायुक्तांचाही समावेश आहे. डॉ. विनयकुमार राठोड यांची वागळे परिमंडळ ५ मधून शहर वाहतूक शाखेत, डॉ. सुधाकर पठारे यांची विशेष शाखेतून उल्हासनगर परिमंडळ येथे तर गणेश गावडे यांची पोलीस मुख्यालयातून परिमंडळ १ येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. विनयकुमार राठोड यांची झालेली बदली ही बक्षीस आहे की शिक्षा आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षपणे ही बक्षिसी असल्याचंच सुचवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading