बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त

कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. गायमुख चौपाटी येथे दोन व्यक्ती इनोव्हा कारमधून बनावट चलनी नोटा छापून विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून राम शर्मा आणि राजेंद्र राऊत यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे २ हजार रूपयाच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटा असलेली ४०० बंडल असे एकूण ८ कोटी रूपये मिळाले. त्यांची चौकशी केली असता मदन चौहाण याच्या मदतीने पालघर येथे बनावट नोटा विक्री करण्याकरिता आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. शर्मा याची पालघर येथे संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने नोटा बनवण्याचा गाळा असल्याची माहिती पोलीसांना तपासात मिळाली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading