सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मावळी मंडळच्या अ‍ॅरॉन फिलीपला सुवर्णपदक

पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील 100 आणि 200 मीटर रनिंग स्पर्धेत ठाण्यातील मावळी मंडळ संस्थेचा अ‍ॅरोन फिलीप याने सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याने 100 मीटर रनिंग 11.29 सेकंद तर 200 मीटर रनिंग 22.63 सेकंदात पूर्ण करत यश मिळविले. मात्र 100 मीटरचा रेकॉर्ड 0.4 शतांशने हुकला. त्याच्या यशाबद्दल मावळी मंडळ संस्थेचे अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षक आणि संस्था व्यवस्थापनाकडून त्याचे कौतूक होत आहे. तसेच अ‍ॅरोनची आगामी एसजीएफआय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मावळी मंडळ ही खेळासाठी विशेष महत्व जपणारी शैक्षणिक संस्था आहे. फुटबॉल, कबड्डी, खो-खोसह जिम्नॅस्टिक आणि अ‍ॅथलेटिक्स खेळासाठी शाळेतील प्रशिक्षण मिलिंद यादव, मिलिंद कदम, दर्शन देवरुखकर, प्रथमेश तांडेल, प्रणय कामले, नाईक आणि बाबू आदी प्रशिक्षक मुलांच्या खेळासाठी विशेष मेहनत घेत आहेत. राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अ‍ॅरोन फिलीपने मिळवलेल्या दोन सुवर्ण पदकाने मावळी मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अ‍ॅरोनने लहानपणापासूनच अ‍ॅथलेटिक्सच्या अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading