माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. कोविड महामारी पश्चात संकटात सापडलेल्या गोरगरीब कुटुंबीयांना छोटा मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मनिर्भर निधी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली आहे. गेल्यावर्षी नौपाडा प्रभागातून तीन हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावर्षी फक्त फेरीवालेच नाही तर घरातून छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी 7% व्याजदराने या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तरीही प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने ही योजना प्रभागातील गावदेवी, न्यू प्रभात नगर, येथे राबविण्यात आली. या शिबिरासाठी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading