बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक करण्यात आली. प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदिप त्रिभुवन आणि कैलास गावडे यांना या प्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. बनावट बांधकाम प्रमाणपत्राचा वापर करून अनधिकृत विकासकामे करणारे जमीन मालक, विकासक, कंत्राटदार यांची माहिती मिळवून प्रत्यक्षात बनावट बांधकाम प्रमाणपत्र तयार करून त्याद्वारे महारेरा प्रमाणपत्र उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याआधारे पोलीसांनी चौकशी करून या पाचजणांना अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading