घटस्फोटीत असल्याचे सांगून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी केली अटक

घटस्फोटीत असल्याचे सांगून मॅट्रीमोनी अॅपद्वारे विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी अटक केली. राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रूपेश यशवंतराव हा पुराणिक सिटी येथे राहणारा विविध महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करत असल्याची तक्रार पोलीसांकडे दाखल झाली होती. मॅट्रीमोनी अॅपद्वारे महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष तो दाखवत होता आणि त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवत होता. स्वत:चे अस्तित्व लपवून खोटी नावं सांगून तो महिलांशी संबंध ठेवत असल्याचं तपासात दिसून आलं. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. अशाप्रकारे पोलीसांनी त्याला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading