ठाण्यातील नागरी चळवळीतील प्रदीप इंदुलकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील नागरी चळवळीतील प्रदीप इंदुलकर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. काल संध्याकाळी मुंबईतून घरी येत असताना रस्त्यातच त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते रस्त्यातच कोसळले. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल केलं होतं परंतु उपचारादरम्यान रात्री १२ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. इंदुलकर यांचे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन बाबतीत फार मोलाचे योगदान होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर वागळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading