प्रा. महेश भानुशाली यांना मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पीएचडी

डॉ. व्ही. एन. बेडेकर व्यवस्थापन संस्थेमध्ये कार्यरत असलेले आणि शहापूर येथे स्थायिक असलेले प्रा. महेश भानुशाली, यांना मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील विद्या वाचस्पती ‘पीएचडी’ ही पदवी जाहीर झाली आहे. ‘भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील आधुनिक तंत्रज्ञान विकास, व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रणाली’ ह्या विषयात केलेल्या अतुलनीय संशोधन प्रबंधासाठी ही पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात ‘भारताला विकसीत राष्ट्राकडे घेऊन जाणाऱ्या वाटचालीत प्रा.भानुशाली यांनी केलेल्या संशोधनाचे महत्वाचे योगदान ठरणार आहे, सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्षमता आणि परिणामकारीता सुदृढ करण्याचे काम ही प्रणाली करेल’ असे मत ओएनजीसी चे प्रमुख मानव संसाधन ‘एम.गणेशन’ यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाच्या संशोधक डॉ. रितू भट्टाचार्य यांनी वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करून या संशोधनाद्वारे देशहीत आणि समाजहीत कसे होईल हे साध्य केले आहे. तांत्रिक उपकरणांवर होणारा प्रचंड खर्च कमी करून, केंद्रीकृत खरेदी केल्याने सार्वजनिक क्षेत्र तांत्रिक दृष्टया विकसित होईल असे तंत्र यात दिलेले असल्याने हा प्रबंध देशाच्या संशोधन क्षेत्रात महत्वाचे योगदान करत आहे. हा ४०० पानांचा प्रबंध असून इंग्रजीत आहे. आपल्या अतुलनीय कामगिरी बद्दल प्रा.भानुशाली यांना ह्या आधीही ‘सर्वोत्तम प्राध्यापक-व्यवस्थापन’, ‘सर्वोत्तम संशोधक-व्यवस्थापन’ ह्या नामांकित राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते मेकॅनिकल इंजिनिअर आणि व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असून विद्यार्थीप्रिय आहेत. प्रा.महेश भानुशाली यांच्या नावे आतापर्यंत व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान शाखेतील ४ पुस्तके, २ पेटंट आणि १५ शोधनिबंध असून त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय संशोधकांनी वेळोवेळी घेतलेली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading