कोकण प्रांत राज्यस्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धेचं आयोजन

कोकण प्रांत राज्यस्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धा थिराणी विद्यामंदिरात आयोजित करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. वनवासी कल्याण आश्रम ही अखिल भारतीय संस्था गेली ६९ वर्ष वनवासी बांधवांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी, जनजातीच्या प्रगतीसाठी काम करीत आहे. याच ध्येयाने वनवासी कल्याण आश्रम, जनजाती बाधवांच्या क्रिडा नैपुण्याला वाव मिळावा, जनजाती मूलांना आपले खेळातील प्राविण्य सिध्द करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने संपूर्ण भारत भर जनजाती मुलांसाठी खेलकूद स्पर्धांचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील अशा खेलकूद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण प्रांतातील ठाणे, पालघर, शहापूर, रायगड, कुलाबा अशा ५ जिल्ह्यातील जनजाती मुलांच्या तालुका, जिल्हा स्पर्धा यामधून विजयी झालेले एकूण १७५ खेळाडू या प्रांत स्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रांत स्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना वाराणसी, उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. या खेलकूद स्पर्धा २९ आणि ३० ऑक्टोबरला सावित्रीबाई थीराणी विद्यामंदिरात आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर तसेच तिरंदाजी प्रशिक्षक पंकज आठवले यांच्या हस्ते तर बक्षीस आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading