लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी घेतले ताब्यात

लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मनोज साळवी याच्या वाढदिवसानिमित्त मनोज साळवी, मनोज गौड, चंदन दुबे, विकास तिवारी, राजेश श्रीवास्तव, राजेश सिंग, कमल सिंग यांनी मुंब्रा देवी कॉलनी येथे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री १२ वाजता हवेत २ राऊंड फायर केल्याचा व्हॉटस् मेसेज आल्याची माहिती मुंब्रा पोलीसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सखोल चौकशी करत केदारनाथ राजभर या सुरक्षा रक्षकाने त्याच्या परवाना प्राप्त १२ बोअर बंदूकमधून २ राऊंड उत्सवानिमित्त राहत्या घराच्या बाहेर येऊन फायर केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तसंच मनोज साळवी यांच्या वाढदिवसाचा या घटनेशषी कोणताही संबंध नसून व्हॉटस् अप मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या कोणाचाही या घटनेत सहभाग नसल्याचं दिसून येत आहे. हा मेसेज कोणीतरी समाजकंटकांनी खोडसाळपणे केला असल्याचं दिसून येत असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading