ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश आलं आहे. आज पहाटे घंटाळी येथे अश्विन गमरे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून जखमी करण्यात आले. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकमान्यनगर पाडा नं ४ येथील जंगलातील नाल्याजवळ नामचीन गुंड गणेश जाधव उर्फ काळा गण्या याला खंडणीच्या रक्कमेची मागणी करूनही दिली नाही म्हणून आरोपी बिपीन मिश्रा आणि सौरव शिंदे यांनी गणेश जाधव याच्या डोक्यात गोळी मारून त्याला गंभीर जखमी केले. ठाण्यात एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने पोलीस आयुक्तांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेला बिपीन मिश्रा आणि सौरव शिंदे हे मुलुंड पूर्व येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading