विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राज्याच्या राजधानीत गौरव

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळाने २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅक चे मानांकन प्राप्त झाले. एवढ्या कमी कालावधीत नॅक चे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्वात तरुण महाविद्यालय म्हणजे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय होय. विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना 2020 पासून सुरू केली आणि विद्या प्रसारक मंडळाची शिष्यवृत्ती सुरू केली या माध्यमातून १५० विद्यार्थ्यांना प्रथम आणि थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिक महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन इत्यादी योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालय राबवत आहे. उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या ह्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन Pride Of Nation Awards 2022 या समारंभात Asia Today ह्यांच्या कडुन महाराष्ट्रातील सर्वात प्रशंसनीय अभियांत्रिकी महाविद्यालय असा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोशियारी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने संचालिका कीर्ती आगाशे यांनी स्वीकारला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading