विद्या प्रसारक मंडळाच्या व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् च्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् ने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. या व्यवस्थापन अभ्यास संस्थेचे संचालक डॉ. नितीन जोशी यांना उच्च शिक्षणामधील डायरेक्टर ऑफ द इयर २०२२ हा पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका सोहळ्यात डॉ. नितीन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातून ५० व्यक्तींची नावं निवडण्यात आली होती. त्यामध्ये जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात विविध विद्यापीठाचे कुलपती, उपकुलपती, अधिष्ठाता तसंच विविध १०० हून अधिक खाजगी विद्यापीठाचे संचालक, व्यवस्थापन अभ्यासक्रम अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचं महत्व या विषयावर यावेळी चर्चा झाली. एक दिवसाच्या या कार्यक्रमात उभरत्या तंत्रज्ञानाचा शिक्षणामधील सहभाग या विषयावर उच्चस्तरीय चर्चा झाली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading