नव्याने लोकार्पण झालेल्या मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार

ठाण्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. रविवारीच मीनाताई ठाकरे चौक आणि संत नामदेव चौकातील उड्डाणपूलाचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं. यातील मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावरून कामानिमित्त भरधाव निघालेल्या जितू धोत्रे याचं उड्डाणपूलावरील वळणावर नियंत्रण सुटल्यानं पूलाच्या खांबाला धडक बसली आणि या अपघातात जितू धोत्रे याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading