शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरीत देण्याची आमदार संजय केळकरांची मागणी

शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरीत द्यावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास सुसह्य होण्यासाठी जाहीर केलेल्या वाढीव चटई क्षेत्राचे परिपत्रक काढून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. मुख्यमंत्र्यांनी जुन्या ठाणे शहरातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मागील अधिवेशनात जाहीर केला होता आणि इमारतींचा विकास होण्याकरिता वाढीव चटई क्षेत्र देण्याचं जाहीर केलं होतं. त्याबाबत नगरविकास खात्यानं परिपत्रक काढून लाखो ठाणेकरांना विकासाचा मार्ग प्रशस्त करावा तसंच पालिका आयुक्तांनी अचानक विकास कामांवर आणलेली स्थगिती त्वरीत उठवावी आणि विकास काम सुरू करावी असं त्यांनी सांगितलं. आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी ठाणेकरांसाठी ही कामं सुरू झाली पाहिजेत, हजारो कोटींची ही विकास कामं असून प्रशासनानं आणि आयुक्तांनी जनहिताच्या आड येऊ नये. शासनानं त्वरीत हस्तक्षेप करून हा एकतर्फी निर्णय रद्द करून विकास कामं सुरू करण्याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading