रामनगरमधील एका विहीरीत सापडलं मगरीचं पिल्लू

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात मगरीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ उडाली आहे. वागळे इस्टेटमधील रामनगर येथील एका विहीरीत हे मगरीचं पिल्लू काल आढळलं होतं. हाताच्या तळव्यावर मावेल एवढं हे मगरीचं पिल्लू असून मूळात मगरीचं पिल्लू विहीरीत कसं आलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन्यजीव प्रेमी संस्थेनं या मगरीच्या पिल्लाची विहिरीतून सुटका केली आहे. तिच्यावर जुजबी उपचार करून या मगरीची एका तलावात मुक्तता करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading