आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा ठाणे कारागृहात स्मृतीस्तंभ उभारणार

आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील ठिकाणावर आमदार निधीतून स्मृतीस्तंभ उभारण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या १७४ व्या बलिदानदिनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने क्रांतीवीर राघोजी भांगरे चौकात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ठाणे मध्यवर्ती कारागृहात बलिदान दिलेल्या ठिकाणावर आदरांजली वाहण्यात आली. ठाणे कारागृहाबाहेर सद्यस्थितीतील राघोजी भांग्रेंचा पुतळा शहरातील महत्वाच्या भागात बसवावा. त्याचबरोबर केंद्र वा राज्य सरकारकडून निधी मिळवून ठाणे कारागृहात हुतात्म्यांना फाशी देण्यात आलेली जागा सुव्यवस्थित करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली. राघोजी भांगे यांनी अत्यल्प साधने असताना उभारलेला स्वातंत्र्यलढा हा एक असामान्य होता, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राघोजी भांगरे यांना बलिदानदिनी अभिवादन कार्यक्रम पार पडला नव्हता. मात्र आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे अभिवादनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading