स्टारफिशच्या जलतरणपटूंनी गोव्यातील अटल सेतू ते बांबोलीम् बिच हे 15 कि.मी अंतर पोहून केले पार

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना सलामी देण्यासाठी ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी गोव्यातील अटल सेतू ते बांबोलीम् बिच हे 15 कि.मी सागरी अंतर पोहून पार केले. तसेच 10 वर्षाखालील जलतरणपटूंनी 7 कि.मीचे अंतर पार केले. गोव्यातील या जलतरणपटूंच्या कामगिरीचे कौतुक आमदार निरंजन डावखरे यांनी प्रत्यक्ष भेट घेवून केले. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे समुद्राला देखील उधाण आले होते, या सर्व अडचणींचा सामना करीत या जलतरणपटूंनी अटल सेतू ते बांबोलीम् बिच हे सागरी अंतर यशस्वीरित्या पार केले. यावेळी 16 कि.मीचे अंतर मानव मोरे, आयुष तावडे, वेध दुसा यांनी पार केले तर 6 कि.मी चे अंतर आयुषी आखाडे, रेवती वाघ, फ्रेया शहा, श्रुती जांभळे, युवराज राव, रुद्र निसार, तृणांश गंद्रे यांनी यशस्वीरित्या पार केले. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे आणि कोपरी येथील नायट्रो फिटनेस तरणतलाव येथे सकाळ -संध्याकाळ सत्रात सराव करीत होते.

 

Leave a Comment

%d bloggers like this: