आंतर जिल्हा जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी 23 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्यपदकं पटकावत मिळवलं सांघिक विजेतेपद

डोंबिवलीत झालेल्या आंतर जिल्हा जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी 23 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची लयलूट करत सांघिक विजेतेपदक पटकाविले. डोंबिवलीत ब्रेस्टस्ट्रोक, फ्री स्टाईल आणि आयाम या क्रीडाप्रकारात या स्पर्धा झाल्या. विविध स्पर्धांमध्ये 8 वर्षाखालील माही जांभळे हिने 5 रौप्यपदके, 10 वर्षाखालील गटात निधी सामंत हिने 8 सुवर्ण पदके तर फ्रेया शहा हिने 1 सुवर्ण 5 रौप्य आणि 1 कांस्य, रुद्र निसार याने 2 सुवर्ण, श्रुती जांभळे हिने 1 सुवर्ण, वरद कोळी याने 2 सुवर्णपदके पटकाविली. तर 12 वर्षाखालील गटात आदित्य घाग 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदके, परीन पाटील याने 3 रौप्य 4 कांस्यपदके तर मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने 6 सुवर्ण आणि कांस्यपदके, रेवती वाघ हिने 6 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकाविली. 14 वर्षाखालील गटात सोहम साळुंखे याने 1 रौप्य आणि 4 कांस्यपदके पटकाविली. तर संपूर्ण स्पर्धेत आयुषी आखाडे आणि निधी सामंत यांनी वैयक्तिक चॅम्पीयनशीप पटकाविली. तर स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनने सांघिक विजेतेपद पटकाविले. हे सर्व जलतरण पटू कैलास आखाडे, रुपेश घाग आणि अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: