वर्तकनगरमधील बिबट्या शोधण्यासाठी ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे

ठाण्यात आढळलेला बिबट्या शोधण्यासाठी वन विभागानं ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वर्तकनगरजवळील परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्यानं दर्शन दिलं होतं. त्यामुळं या भागात काहीशी घबराटही निर्माण झाली होती. या भागात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळं बिबट्याची काहीशी दहशत निर्माण झाली आहे. पोखरण, भीमनगर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ९ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मध्यंतरी दर्शन दिल्यानंतर बिबट्या गायब झाला होता. त्यामुळं आता हा बिबट्या नक्की कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी हे ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading