ठाण्यामध्ये काल एक पाणसाप आढळून आला. हा पाणसाप अर्धविषारी असून हा साप लांबीनं ३० ते ५२ सेंटीमीटर होता. भाईंदरपाडा येथील एका गृहसंकुलात हा साप आढळून आला. वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे सर्पमित्र अभिजित मोरे, रोहन भोईर यांनी दुर्मिळ अशा या सापाची वाघबीळ खाडी येथील नैसर्गिक अधिवासात सुटका केली. जवळपास ८ वर्षांनी या दुर्मिळ सापाचं ठाण्यात दर्शन झालं.