TMC

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुचाकी रूग्णवाहिकांचं लोकार्पण

अपघात ठिकाणी जलद गतीनं पोहचण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं दुचाकी रूग्णवाहिका आणल्या असून काल त्याचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते झालं. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं २०० ॲव्हेन्जर क्रूझ दुचाकीची निवड यासाठी करण्यात आली असून या दुचाकीमध्ये तीन अत्याधुनिक प्रथमोपचाराचे संच ठेवण्यात आले आहेत. शहरात अपघात ठिकाणी तात्काळ पोहचण्यासाठी या दुचाकीचा वापर करण्यात येणार आहे. या दुचाकी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघाताच्या ठिकाणी प्रथमोपचार केला जाणार आहे. काल महापालिकेच्या वतीनं १५ दुचाकी रूग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. आणखी १५ दुचाकी रूग्णवाहिका घेतल्या जाणार असून या सर्व ३० दुचाकी रूग्णवाहिकांचा ठाणेकरांना फायदा होणार आहे.

Comment here