TMC

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्या उद्घाटन होत असून काल महापालिका आयुक्तांनी नवीन खेळपट्टीची पाहणी केली. ठाण्यात पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावरील कलाकार या मैदानात भिडणार असून महापालिका आयुक्तांनी या मैदानाची पाहणी करताना स्वत:ही क्रिकेट खेळून आनंद लुटला. ठाणे महापालिकेच्या वतीनं अत्यंत दर्जेदार अशा क्रीडा संकुलाची निर्मिती झाली असून आयपीएलमधील काही संघ या मैदानात सराव करणार असून भविष्यात रणजीचे सामने या मैदानात होतील असा विश्वास महापालिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. नुतनीकृत करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार आहे. यावेळी काही माजी क्रिकेटपटूही उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत ६ संघ असून यामध्ये मुंबईचे मावळे कर्णधार – संजय जाधव, बाणेदार ठाणे – कर्णधार अंकुश चौधरी, कोकणचे वाघ – कर्णधार सिध्दार्थ जाधव, खतरनाक मुळशी – कर्णधार महेश लिमये, पराक्रमी पुणे – कर्णधार सौरभ गोखले आणि लढवय्ये मिडिया – कर्णधार विनोद सातव यांचा सहभाग असणार आहे.

Comment here