crime

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचं दुकान अज्ञात चोरट्यांनी लुटलं – दुकानातील सव्वा पंधरा लाखांचा ऐवज चोरीला

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचे दुकान फोडून दुकानातील सुमारे पावणे नऊ लाख रूपयांचे ३९ मोबाईल आणि ४० हजारांच्या रोख रकमेसह, १५ लाख २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. काल रात्री दुकान बंद झाल्यावर अज्ञात चोरट्यांनी हे दुकान लुटलं आहे. रेमंड कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर समतानगर येथे जैन ट्रेडर्सचं इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचं दुकान आहे. काल रात्री दुकानाच्या टेरेसचा आणि जिन्याचा दरवाजाचे कुलुप आणि दरवाज्याच्या फ्रेमची बिजागरे तोडून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील तळमजल्यावर असलेल्या मोबाईल गॅलरीमध्ये ठेवलेले ओप्पो कंपनीचे १२, व्हिवो कंपनीचे ५, ॲपलचे ३, सोनीचे २, एचटीसीचे ३, मोबीस्टारचे ८, लिनोव्होचे २ मोबाईल तसंच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईलचे चार्जर, स्पीकर, हेडफोन, ब्लूटूथ, नेकबँड ब्लू टूथ, पॉवर बँक अशा वेगवेगळ्या सुमारे १४ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ४० हजारांची रोकड चोरट्यांनी लुटून नेली. आपला माग लागू नये म्हणून दुकानातील क्लोज सर्किट कॅमे-याची मोडतोडही चोरट्यांनी केली. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Comment here