courtcrime

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार काल भिवंडीत घडला. भिवंडीमध्ये अशरफ अन्सारी या युवकास चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. भिवंडी कोर्टात याप्रकरणी सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती जे. एस. पठाण यांनी त्याला दोषी ठरवलं. त्यामुळं संतप्त झालेल्या अन्सारीनं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल भिरकावली. मात्र न्यायमूर्ती सजग होते त्यामुळं त्यांनी ही चप्पल चुकवली. पोलीसांनी लगेचच अन्सारीला पकडलं. पोलीसांनी याप्रकरणी अन्सारीवर गुन्हा दाखल केला आहे.

Comment here