कल्याण-डोंबिवलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुलींच्या नावाने अडवून त्यांचे मोबाईल पळवून नेणा-या त्रिकुटास अटक

कल्याण-डोंबिवलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुलींच्या नावाने अडवून त्यांचे मोबाईल पळवून नेणा-या त्रिकुटास कल्याण पोलीसांनी अटक केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तू माझ्या गर्लफ्रेंडला का छेडतोस, तिच्यासोबत चॅट का करतोस, माझ्या बहिणीला एसएमएस का करतोस, माझ्या मैत्रिणीला प्रेमाचा एसएमएस का करतोस, फेसबुकवर मेसेज का पाठवतोस अशाप्रकारे विचारणा करून मोबाईल तपासण्यासाठी घेत असे आणि मोबाईल तपासायच्या निमित्तानं वेगवेगळी बतावणी करून एखाद्या इमारतीखाली नेत असत. नंतर मोबाईल घेऊन पळून जात असत. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. याप्रकरणी पोलीसांनी विशेष पथक निर्माण केलं होतं. या पथकानं तपास करून रामकिशन शिंदेला अटक केली. त्याच्या चौकशीत चोरलेले आणि फसवणूक केलेले मोबाईल शोएब शेख, शहनवाझ सय्यद आणि सलीम अन्सारीला विकत असल्याची कबुली दिली. रामकिशन शिंदेनं कल्याण-डोंबिवलीमधील ६ गुन्ह्यांची कबुली दिली असून अधिक तपासात शहनवाझ सय्यद याच्याकडून शिंदेनं विकलेले आणि इतर चोरीचे घेतलेले २३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading