जिल्हा वकील संघटनेची निवडणूक १६ फेब्रुवारीला

ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारीला होणार आहे. वन बार वन व्होट या उच्च न्यायालयाच्या संकल्पनेमुळं लांबणीवर पडलेली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा १ फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा वकील संघटनेची निवडणूक १५ डिसेंबरला होणार होती. पण काही ज्येष्ठ विधीज्ञ वन बार वन व्होट ही संकल्पना घेऊन न्यायालयात गेले. न्यायालयानं ही संकल्पना राबवण्याचे आदेश दिल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा वकील संघटनेनं सुरू केली त्यामुळं ही निवडणूक लांबली. जिल्हा न्यायालयात ३ हजार ७९५ वकीलांची नोंदणी आहे. त्यापैकी १ हजार ८४० सदस्यांनीच या संकल्पनेनुसार प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या प्रतिज्ञापत्राची छाननी केली जात असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading