डी फार्मसी बनावट पदवीका धारण करणाऱ्या चौघांसह अशी पदविका देणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांनाही अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने डी फार्मसी बनावट पदवीका धारण करणाऱ्या चौघांसह अशी पदविका देणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांनाही अटक केली आहे. ठाण्यातील काही औषधांच्या दुकानांमध्ये बनावट पदविकाधारक काम करतअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी चौकशी करून अरविंद कुमार भट आणि बलवान सिंग चव्हाण यांना ठाण्यातून राजीव यादव आणि बुधाराम सोनिया यांना भिवंडीतून ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी ही पदविका डीप पॅरामेडिकल आर्गोनाइजेशन येथून घेतल्याचे सांगितले. प्रत्येकाने या पदविकेसाठी दीड लाख रुपये मोजले होते.पोलिसांनी याप्रकरणी या पांच जणांना अटक केली आहे. हे चौघे साधी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले नव्हते. मात्र डी फार्मसी बनावट पदविका धारण करून खाजगी औषधांच्या दुकानात काम करत होते. सध्या ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा या संस्थेने आणखी किती जणांना अशा पदव्या दिल्या आणि हे पदविकाधारक काय करतात याची चौकशी करत आहेत अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading