6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी पटकाविली 16 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्यपदके

नवीमुंबई बेलापूर येथे वायएमसीएने आयोजित केलेल्या 6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदकांवर आपली नावे कोरली. संपूर्ण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनने 16 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्यपदके पटकाविली. या स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात सवर आकुस्कर हिने फ्री स्टाईल, बटरफ्लाय, बॉक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या चारही प्रकारात एकूण 4 सुवर्णपदक आणि वैयक्तिक 1 सुवर्णपदक पटकाविले. 10 वर्षाखालील गटात आदित्य घाग याने 2 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक, ईदांत चतुर्वेदी याने 1 सुवर्णपदक आणि 1 कांस्यपदक, रोहनु आंबुरे 1 सुवर्ण आणि 2 रौप्य तर 1 कांस्यपदक पटकाविले. आर्य गडे हिने 1 सुवर्ण आणि 2 रौप्यदक, 8 वर्षाखालील विहान चतुर्वेदी याने चारही प्रकारात एकूण 4 सुवर्णपदक आणि वैयक्तिक 1 सुवर्णपदक, आयुषी आखाडे हिने 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक, 6 वर्षाखालील गटात फ्रेया शहा हिने 1 सुवर्ण तर 2 रौप्यपदक पटकाविली. तर या स्पर्धेत रुद्र निसार, वरद कोळी, यश भोसले,विराट ठक्कर, मानस प्रधान, सिध्दांत पोळ, ईशा शिंदे आदी जलतरणपटू सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक अतुल पुरंदरे कैलास आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading