राज्य कामगार विमा योजना रूग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निदर्शनं

राज्य कामगार विमा योजना रूग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निदर्शनं करण्यात आली. राज्य कामगार विमा योजनेमध्ये फेब्रुवारी २०१८ पासून औषधच आली नसल्याचं स्पष्ट झालं. म्हणजेच तब्बल १ वर्ष रूग्ण बाहेरून विकत आणत होते. राज्य विमा कामगार योजनेच्या एकूणच भोंगळ कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. याप्रकरणी दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading