ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर

उल्हासनगर महापालिकेप्रमाणेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांनाही राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे. सध्या नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक असलेले कल्याण धेटे, ठाणे विशेष शाखेतील पोलीस उपनिरिक्षक ज्ञानदेव जाधव, मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक युवराज पवार आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ मधील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आनंदा भिलारे अशा चौघांना राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झालं आहे. राज्यातील ७० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रपतींची पदकं जाहीर झाली असून त्यात ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading