रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवणं चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांना भोवले

राज्यामध्ये तिस-या स्तराच्या निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय ठराविक वेळेतच सुरू ठेवावे लागत असताना ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहिल्याचं प्रकरण ठाण्यातील चार वरिष्ठ अधिका-यांना भोवलं आहे. एका वृत्तवाहिनीनं ठाण्यातील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणारे बार आणि रेस्टॉरंट पहाटे उशिरापर्यंत सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई झाली आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या बार आणि रेस्टॉरंटचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading