सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश परीक्षा

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०२१ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा -२०२१ च्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेक इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ जुलै रोजी एक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्गाच्या प्रवेश परीक्षेसाठी संस्थेच्या जाहिरातीत नमुद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून २० जुलै रोजी अर्ज करण्याचा अंतिम दिवस आहे. २५ जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ३० जुलै रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संस्थेच्या प्रवेश परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती आणि सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डवर तसेच संस्थेच्या www.cdinstitute.in आणि ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन पुस्तके खरेदी करते. तर सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली असून वायफाय इंटरनेट सुविधा देखील विनामूल्य देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading