पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं परिमंडळ ५ मध्ये सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल संबंधितांना परत

पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं परिमंडळ ५ मध्ये सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. कासारवडवली पोलीस ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. २३ गुन्ह्यातील २४ लाखांचे ९९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो चांदी, २४ गुन्ह्यातील एक लक्झरी बस, ३ कार, ३ रिक्षा, १७ दुचाकी आणि १ लाख ११ हजार रूपयांचे १० मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोन्याचे दागिने परिधान करताना आणि दुचाकीला कुलुप लावताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading