आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदार कंपनीने घातला चक्क दोन महिला वकिलांना गंडा

आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून बीएसएम गोल्ड अँड डायमंड नामक गुंतवणूकदार कंपनीने चक्क दोन महिला वकिलांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काळाचौकी येथील सुप्रिया पवार आणि घाटकोपर येथील अपूर्वा पुजारी अशी फसवणूक झालेल्या वकिलांची नावे आहेत. नोव्हेंबर 2015 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत दोघींनी राम मारुती रोडवरील बीएसएम गोल्ड या कंपनीत गुंतवणूक केली होती. कंपनीचे मालक आनंद कोनार आणि व्यवस्थापक अजित सानप यांनी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्याबाबतच्या पावत्या आणि प्रमाणपत्रेही कंपनीकडून ठेवीदारांना देण्यात आली होती. मात्र मुदत ठेवीची अंतिम तारीख नोव्हेंबर महिन्यात असल्याने रक्कम परताव्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी दोघीही ठाण्यातील कार्यालयात गेल्या. तेव्हा कंपनीला टाळे ठोकून मालकाने गाशा गुंडाळल्याचे आढळले. त्यांची 1 लाख 56 हजारांची आर्थिक फसवणूक झाली असून कोनार आणि सानप यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading