मुरबाड तालुक्यातील ४० कोटींच्या रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचं जाळं सक्षम करायला प्राधान्य दिलं असून काल मुरबाड तालुक्यातील ४० कोटी रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आलं. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचं जाळं मजबूत करावं लागेल या हेतूनं जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाचा निधी एकनाथ शिंदे यांनी आणला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोट्यावधींची कामं मंजूर केली आहेत. काल मुरबाड तालुक्यातील ६८ किलोमीटरहून अधिक रस्त्यांच्या कामांचं भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading