महापालिकेची ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार

मुंब्रा प्रभाग समितीमधील अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी महापालिकेनं ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर अमृतनगर, किस्मत कॉलनी आणि तन्वर नगर इत्यादी परिसरातील ८ बाकडी, २५ ठेले, २२ हातगाड्या, २ उसाच्या रसाच्या गाड्या, ३ पानटप-या आणि ५ दुचाकींवरही कारवाई करण्यात आली. किस्मत कॉलनी ते तन्वरनगर पर्यंत बांधलेल्या ६३ शेडस् तोडण्यात आल्या. यापुढे शहरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि बॅनरवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading