ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या विविध आंदोलने सुरू आहेत. १० मे रोजी शब-ए-कदर, १३ मे रोजी शिवजयंती(परंपरेने), आणि १४ मे रोजी रमजान ईद/अक्षय्य तृतीया/छत्रपती संभाजी राजे जंयती असे सण उत्सव संपन्न होणार आहे. शस्त्रे बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे तसंच पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मनाई आदेश ३० एप्रिल पासून १४ मे पर्यंत लागू राहील, तर आदेशाचा भंग करणा-यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading