शहर दैनिक पत्रकार संघातर्फे सदस्यांकरिता कर्करोग तपासणीचं आयोजन

तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करण्याचं टाळा, ही सवय असून त्यापासून परावृत्त व्हा असं आवाहन कर्करोगतज्ञ डॉ. प्रितम काळसकर यांनी केलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे आयोजित वैद्यकीय शिबीराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी काळसकर बोलत होते. आजच्या घडीला महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण प्रत्येक २२ महिलांमागे एक आहे. या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास त्यातून बचावण्याची क्षमता ९० टक्के असते. पण भारतात मात्र हे निदान उशीरा होतं त्यामुळं दोन पैकी १ महिला पाच वर्षापेक्षा जास्त जगत नाही असं डॉ. काळसकर यांनी सांगितलं. कर्करोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं असून त्याकरिता कर्करोग झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी प्रोत्साहीत करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्करोगापासून दूर राहण्यासाठी व्यसनांना तिलांजली द्या असं आवाहनही डॉ. काळसकर यांनी यावेळी केलं. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी कर्करोगाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजांची माहिती दिली. या शिबीरामध्ये पुरूषांची डोकं, फुफ्फुसं, नाक तर महिलांची ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तर ५० वर्षापुढील व्यक्तींची पिसा कॅन्सर तपासणी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading