गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का

गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे.मुंब्र्यामध्ये या लसीकरणाविषयी विविध अफवा निर्माण झाल्यानं विद्यार्थी लसीकरणापासून दूर राहिले आहेत. ही लसीकरण मोहिम हाणून पाडण्याकरिता सामाजिक संकेतस्थळावर या लसीकरणाविषयी अफवा निर्माण केल्या जात आहेत. ही लस दिल्यानं मुलं दगावतात, प्रजनन क्षमता कमी होते अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मुंब्र्यामध्ये मंगळवारपासून या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. लसीकरणाच्या दिवशी काही शाळांमधले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहिल्याचं दिसून आलं. ठाण्यातील काही शाळांमधून खाजगी डॉक्टरांकडून ही लस घेण्याचा आग्रह पालकांकडून केला जात आहे. मात्र बाहेरून ही लस देणं खर्चिक आहे. एकूणच या लसीकरण मोहिमेविषयी निरनिराळ्या अफवा निर्माण झाल्यानं लसीकरण अडचणीत आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading