सरकारी जागांवर वाहनतळ उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव

ठाण्यातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, एसटी डेपो, झेडपी कार्यालय, गावदेवी मार्केट या ठिकाणी वाहनतळ उभारले जाणार आहेत. ठाणे महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत याबाबतचे प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातील एसटी डेपोच्या जागेवर वाहनतळ, जुने महापालिका कार्यालय, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कन्याशाळा आणि जिल्हा परिषद कार्यालय एकत्र करून नव्यानं सरकारी कार्यालयाबरोबरच सार्वजनिक वाहनतळ उभारण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता एक प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी डेपोच्या जागी भूमीगत वाहनतळ उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. यामुळं रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची सुविधा सुटू शकणार आहे. कळवा एसटी डेपोच्या जागेत सध्याच्या आगाराला हात न लावता उर्वरीत जागेत वाहनतळ उभारला जाणार आहे. हे सर्व प्रकल्प लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीवर काहीशी मात करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading