TMC

कचरा विल्हेवाटीच्या योजनेला महापालिका आयुक्तांची एक महिना मुदतवाढ

ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं शहरातील गृहनिर्माण संकुलं, शासकीय आणि वाणिज्य संस्थांना कचरा विल्हेवाटीसाठी बजावण्यात आलेल्या नोटीसीला महापालिका आयुक्तांनी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मात्र या मुदतीनंतर घनकचरा विल्हेवाटीची अंमलबजावणी न करणा-या कचरा उत्पादकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

TMC

ठाणे महापालिका उभारतेय २५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक

ठाणे महापालिका शहरामध्ये २५ किलोमीटर लांबीचा एक सायकल ट्रॅक उभारत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सायकल ट्रॅकची पाहणी केली.

TMC

आधुनिक ठाण्याची ओळख ठरणा-या हॅश टॅग ठाण्याचं महापालिका आयुक्तांच्या हस्ते अनावरण

संपूर्ण देशामध्ये प्रथम डीजी प्लॅटफॉर्म निर्माण करणारे ठाणे शहर जगभरातील लोकांशी जोडणा-या हॅश टॅग ठाण्याचे अनावरण महापालिका आयुक्तांच्या हस्ते झालं.

TMC

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचं महापालिका आयुक्तांचं आवाहन

पावसाळ्यामध्ये कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे.

TMC

वृक्षाधिकारी केदार पाटील यांना तात्काळ वृक्षाधिकारी पदावरून हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ठाण्याचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांना तात्काळ वृक्षाधिकारी पदावरून हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

TMC

सोळंकी सदन या धोकादायक इमारतीतील दुकानं वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानं रहिवाशांमध्ये संताप

ठाणे महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीच्या यादींमधील सी-एक श्रेणीमध्ये मोडणा-या इमारती तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश दिलेले असतानाही ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सोळंकी सदन या धोकादायक इमारतीतील दुकानं वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानं रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

TMC

ठाण्यातील विश्रामगृहासमोरच्या वर्तमानपत्र विक्री करणा-या स्टॉलवर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाण्यातील विश्रामगृहासमोरच्या वर्तमानपत्र विक्री करणा-या स्टॉलवर ठाणे महापालिकेनं कारवाई केली आहे.

TMC

टायर्स पंक्चर दुकानदारांना आपल्या दुकानासमोर डासांच्या अळ्या निर्माण न होण्याची दक्षता घेण्याची पालिकेची सूचना

दुकानाबाहेर टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर दुकानांबाहेर उघड्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानाच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होत असते. यामुळं शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी […]

TMC

महापौरांनी मंजुरी नाकारल्यामुळं आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टीवलमध्ये सहभागी होण्याची महापालिकेची संधी हुकली

देशातील सर्वात मोठ्या स्टार्ट अप प्रकल्पाची लंडनमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टीवलमध्ये सहभागी होण्याची संधी महापौरांनी ऐनवेळी मंजुरी न दिल्यानं हुकली आहे.