zp

केंद्रीय पंचायत राज विभागाच्या अतिरिक्त सचिवांची जिल्हा परिषदेला भेट

महाराष्ट्र शासन पंचायत राज विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेनं राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय पंचायत राज विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी जिल्हा परिषदेला भेट दिली.

zp

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांचं आवाहन

जिल्ह्यामध्ये एकूण २१ शाळा अनधिकृत असून या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये. असा प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची असेल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी कळवलं आहे.

general zp

अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना त्यांच्या निवासस्थाना जवळच्या शाळा देण्याची शिक्षक सेनेची मागणी

खाजगी शाळांमधील शिक्षकांना जिल्हा परिषद, महापालिका अथवा नगरपालिकांच्या शाळांमध्ये सामावून घेताना शिक्षकांना त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये समायोजन करावे अशी मागणी शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी केली आहे.

zp

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रूग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत – एकनाथ शिंदे

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रूग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत या दृष्टीनं कुठेही त्यांची अडवणूक होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. येणारा पावसाळा लक्षात घेऊन साथ आणि इतर रोगांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा राहील याची काळजी घेतली पाहिजे असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

zp

ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन

ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झालं.

zp

जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीच्या सभापतींना यशदामध्ये प्रशिक्षण

ठाणे जिल्हा परिषदेतील सदस्यांना जिल्हा परिषद कामकाज विषयक धडे पुण्याच्या यशदा मध्ये दिले जाणार आहेत.

zp

बदली होणा-या शिक्षकांना ठाण्यातच सामावून घेण्याचे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचे आदेश

पालघरमधून ठाण्यात येण्यासाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ठाण्यात सामावून घेण्याबरोबरच पालघरमध्ये बदली होणा-या शिक्षकांनाही ठाणे जिल्ह्यातच सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिले आहेत.