दिवा ते डोंबिवली बस सेवा अखेर सुरू

अनेक वर्षांपासून मागणी केलेली दिवा ते डोंबिवली ही ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बस सेवा अखेर गुरुवार पासून सुरू झाली.

Read more

Categories TMT

परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

शुक्रवार पहाटेपासून पासून परिवहन सेवेच्या कंत्राटी वाहकांनी विविध मांगण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, मात्र अद्यापही या संपाकडे प्रशासनाने लक्ष दिल्याचं दिसत नाही. दरवर्षी ठामपा सामान्य करदात्यांच्या पैशातून मदत देऊन टीएमटी च्या तुटीचा अर्थसंकल्प सावरून परिवहन सेवा मार्गक्रमण करीत आहे. परिवहन सेवेच्या कंत्राटी वाहकांनी सात ऑगस्ट रोजी निवेदन पाठवून २१ ऑगस्ट रोजी संप करण्याचे … Read more

Categories TMT

आपल्या मागण्यांसाठी परिवहन सेवेच्या कर्मचा-यांनी केलेल्या आंदोलनामुळे परिवहन सेवा विस्कळीत

ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्याने परिवहन सेवा विस्कळीत झाली.

Read more

Categories TMT

टीएमटी कर्मचाऱ्यांची १६० कोटीची थकबाकी – टीएमटी एप्लॉईज युनियन घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

ठाणे परिवहन (टीएमटी) सेवेतील कर्मचाऱ्यांची तब्बल १६० कोटींची थकबाकी येणे आहे. सातव्या वेतन आयोगापोटी १२० कोटी थकबाकी असुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे २७ कोटींचे निवृत्ती उपदानही थकीत आहे. तेव्हा, ठाणे महापालिकेच्या आस्थापनेत सामावुन घ्या तसेच थकबाकी द्यावी. या मागण्यांसाठी गुरुवारी टीएमटी एप्लॉईज युनियनच्या झेंड्याखाली शेकडो टीएमटी कर्मचाऱ्यानी एकजुटीचे दर्शन घडवत वागळे आगारात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी थकबाकीसह विविध मागण्यांसाठी येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार असल्याचे सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परिवहन सेवेची सुरुवात फेब्रुवारी १९८९ मध्ये झाली. पण आज टीएमटी अक्षरशः गाळात रुतली असुन महापालिकेच्या अनुदानावरच टीएमटीचा डोलारा उभा आहे. टीएमटीने सादर केलेल्या ५६७.९१ कोटीच्या अर्थसंकल्पात तब्बल ४६० कोटी ५४ लाखांच्या अनुदानाची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने केवळ वेतनापुरतेच अनुदान मंजुर केल्याने टीएमटीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासुनची कोट्यवधीची थकबाकी शिल्लक आहे. या तसेच, ६१३ कर्मचा-यांना कायम करणे,१२ आणि २४ वर्षाच्या आश्वासित वेतन श्रेणीचा लाभ देणे, ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने दंड थोपटले आहेत. टीएमटीमधून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. येत्या काही वर्षात बरेचसे कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यांना दयावयाचे उपदान, सेवानिवृत्ती वेतन आणि रजेचा पगार देणे आवश्यक आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेचे बोरिवली, नालासोपारा आणि रामनगर मार्गे वागळे आगार हे बस मार्ग ठाणे पश्चिमेकडील सॅटीसवरून चालविण्यात येणार

ठाणे पूर्व येथील उड्डाणपूलाच्या कामामुळे, ठाणे पूर्व येथून चालविण्यात येणारे ठाणे परिवहन सेवेचे मार्ग क्र. ६५ (बोरिवली), मार्ग क्र. ६९ (नालासोपारा) आणि मार्ग क्र. १११ (रामनगर मार्गे वागळे आगार) हे बस मार्ग गुरुवार, आजपासून ठाणे पश्चिमेकडील सॅटीस येथून चालविण्यात येत आहेत.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण झालं.

Read more

परिवहनच्या वातानुकूलित बसेसचे ‍तिकिट दर केले कमी

ठाणे शहरातील नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी ठाणे महानगरपालिकेची ठाणे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षम व्हावी व प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना या बससेवेचा फायदा घ्यावा व ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी असावी यासाठी वातानुकूलित बससेवेचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन … Read more

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या नवीन बसेस दाखल होणार

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या २० नवीन बसेस दाखल होणार आहेत.

Read more

आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या घोडबंदर मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र 12 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे.

Read more