राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण निवड आणि फिंन्सस्विमिंग राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट केली आहे.

Read more

जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील विहान गावंडला विजेतेपद

जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबच्या विहान गावंड याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत कुश पाटील याचा ३ –० असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

Read more

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ यांना साउथ आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक

ठाणे शहरातील वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ यांनी साउथ आफ्रिकेत झालेल्या ”कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत,,कांस्य पदक पटकाविल आहे.

Read more

ठाण्याच्या  नुबैरशाह शेखने विजेतेपद राखले –  दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्णपदक 

ललितपूर, नेपाळ येथे १३ ते १८ जून दरम्यान संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर व सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथील स्थापत्य अभियंता नुबैरशाह शेख याने अपराजित राहत  सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. जागतिक बुद्धिबळ महासंघ  व आशियाई बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने आयोजित अधिकृत दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे यजमानपद नेपाळ बुद्धिबळ महासंघास बहाल करण्यात आले होते. ही दुसरी दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा होती. प्रथम दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा नोव्हेंबर -२०१९ मध्ये ढाका, बांगलादेश येथे संपन्न झाली होती. त्या स्पर्धेत देखील नुबैरशाह शेख याने देशाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले होते. सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून नुबैरशाहने अनोखा विक्रम केला आहे. दक्षिण आशियाई आठ देशांपैकी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, मालदीव या देशांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. पुरुष व महिला दोन्ही गटाची ही स्पर्धा स्वतंत्रपणे घेण्यात आली. प्रत्येक देशातून एक अधिकृत खेळाडू व २०१९ च्या स्पर्धेचा विजेता यांनाच स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता.

Read more

नॅशनल लाईफसेव्हिंग स्विमींग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी

बंगळूरु येथे नुकत्याच झालेल्या 18 व्या नॅशनल लाईफसेव्हिंग स्विमींग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी यशस्वी कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली.

Read more

कोरिया मध्ये ठाण्याच्या ऍथलिट डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांची उत्कृष्ट कामगिरी

आशिया पॅसिफिक मास्टर गेम्स जिओनबुक कोरिया 2023 या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्या डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Read more

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकवणारे खेळाडू पैशांअभावी राहत आहेत मागे

केरळ येथे झालेल्या इंटरनॅशनल एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताला दोन गोल्ड मेडल तर दोन सिल्वर मेडल आणि एक स्ट्रॉंग मॅन चा किताब प्राप्त झाला आहे.

Read more

सिंगापूर येथे होणा-या एशियन चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील तीन मुलांची निवड 

एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली.

Read more

दुबई येथे झालेल्या कराटे स्पर्धेत कशिश तडवीला सुवर्णपदक

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय दुबई बुडोकॉन कप ऑल स्टाईल कराटे चॅम्पियन शिप सिलिकॉन ओसिस स्पर्धेत कशिश तडवीला घवघवीत यश मिळालं. 

Read more

मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंतिम विजेतेपद

मावळी मंडळ आयोजित 98 व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त 70 व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर,  पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरअंतिम विजेतेपद पटकावले.

Read more