विजय क्रिकेट क्लबने पार्कोफिनला चकवले

स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जान्हवी काटे आणि जाग्रवी पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने गतविजेत्या पार्कोफिन क्रिकेट क्लबवर पाच विकेट्सनी विजय मिळवत अर्जुन मढवी स्मृती टी ट्वेन्टी महिला लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले.

Read more

जान्हवी काटेचा फलंदाजीचा झंझावात

फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि नंतर तेवढीच धुवांधार फलंदाजी करत जान्हवी काटेने विजय क्रिकेट क्लबला एकहाती विजयासह अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला २० षटकात ९६ धावांत रोखल्यावर ११.३ षटकात ३ बाद ९७ धावा करत विजय क्रिकेट क्लबने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Read more

विहंग, रा.फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक

विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दि युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले.

Read more

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याच्या ईवा मनोजला सुवर्ण पदक

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची ईवा मनोज हिने १६ वर्षा खालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे.

Read more

निधी दावडाचे झंझावती नाबाद अर्धशतक

निधी दावडाच्या झंझावती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा सामना जिंकत स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने स्पोर्टिंग युनियन क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

Read more

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान किताब मिळवला माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान हा मानाचा किताब माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा ( जॅकी ) दादा यांनी मिळविला.

Read more

आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी

यष्टीरक्षक असलेल्या आयुषी सिंगने ४६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह कुटलेल्या ५८ धावा आणि आकांक्षा पिल्लईने मिळवलेल्या ३ विकेट्स हे अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत ग्लोरिअस क्रिकेट क्लबवर पय्याडे क्रिकेट क्लबच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

Read more

ईश्वरी गायकवाडची अष्टपैलू कामगिरी

ईश्वरी गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिंद क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी – ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

Read more

अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब कमिटीची उपांत्य फेरीकडे कूच

निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने तीन विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

Read more

राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी

जळगाव येथे झालेल्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत युथ जुनिअर आणि सीनियर गटात जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे.

Read more

%d bloggers like this: