मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

Read more

भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मी. ने उघडण्यात आले असून २७२.२७ Cumecs (९६१५.२१५ cusecs) एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, … Read more

भा.दं.वि. 353 कायद्यामधील तरतुदी कमी करण्याच्या राज्य शासनाच्या कृती विरुद्ध राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे निवेदन

शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य काम करून घेण्यासाठी दबाब आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

Read more

आयुष्मान भव” अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ

जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची सर्वंकष जबाबदारी घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या उपचारासाठी लागणारे सर्व सहकार्य करणे, हे आपले काम आहे. त्यासाठी “आयुष्मान भव” अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आयुष्मान आणि आभा कार्ड देण्याचे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेच्या दक्षता पथक क्र-2 ने मुंब्रा खाडीत केली धडक कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेच्या दक्षता पथक क्र-2 ने मुंब्रा खाडीत अतिशय धाडसी अशी कारवाई केली.

Read more

जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा

जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे.

Read more

जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राची बलस्थाने, कमतरता, संधी यांचे विश्लेषण करून माहिती पाठवावी

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होण्यासाठी जिल्ह्यांचे योगदान त्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राची बलस्थाने, कमतरता, संधी यांचे विश्लेषण करून माहिती पाठवावी. जेणेकरून जिल्हा विकास आराखड्यात त्यांचा समावेश करून एक परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करता येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

Read more

दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी दिपक खांडेकर यांनी दिली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात सुशील डेअरी, विष्णू नगर, येथे अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे, अन्न सुरक्षा अधिकारी रा.सि.बोडके आणि वैधमापन विभागाचे एस.बी.जाधव यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. सिटी डेअरी, पाचपाखाडी, … Read more

डिसेंबर पर्यंत काम पूर्ण व्हावी – शंभूराज देसाई

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व कामांना सुरुवात करावी, कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, मात्र ही कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत … Read more

खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशोक शिंगारे

जिल्ह्याची परंपरा आहे की, येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडूंचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे … Read more