Rain

ठाण्यामध्ये आज सकाळपासून पावसाची चांगली हजेरी

ठाण्यामध्ये आज पावसानं सकाळपासून चांगली हजेरी लावली. ठाण्यामध्ये सोमवारपासून पावसानं हजेरी लावली असून कालचा दिवस वगळता पावसानं ठाण्याला झोडपून काढलं आहे. आज सकाळी साडेआठ पासून दुपारी दीड वाजेपर्यंत ठाण्यात ५२ मिलीमीटर पाऊस झाला. सकाळी साडेआठ ते साडेनऊ पर्यंत १६ मिलीमीटर, साडेनऊ ते साडेदहा पर्यंत ७ मिलीमीटर नंतरच्या तासाभरात पुन्हा १६ मिलीमीटर, तर साडेबारा ते दीड या वेळेत ३ मिलीमीटर पाऊस झाला. आज ईदची सुट्टी असल्यामुळं या पावसाचा त्रास फारसा जाणवला नाही. मात्र काही रस्त्यांवर काहीशी वाहतूक कोंडी दिसत होती.

Comment here